manache shlok with meaning । मनाचे श्लोक

manache shlok with meaning

manache shlok with meaning । मनाचे श्लोक अर्थ सहित

जय जय रघुवीर समर्थ !

manache shlok lyrics

शब्दांचे अर्थ : गणाधीश सर्व देवांतील देव (गणपती), मुळारंभ – सुरुवात, सरस्वर्त। देवी, चत्वारि चार, गमू समजून घेऊ, आरंभ, शारदा लक्षात ठेवू, राघव – प्रभू रामचंद्र.

अर्थ : देवांच्या श्रेष्ठ देवाला (गणपतीला) व सरस्वती देवीला नमस्कार करून रामदास स्वामींनी सर्वांना उपदेश केला आहे. तो सर्वांनी लक्षात ठेवावा. नेहमी त्याप्रमाणे वागण्याची सवय लावावी. घरातील कोणत्याही मंगलकार्याच्या वेळी प्रथम गणपतीची पूजा करतात. मगच पुढच्या कामाला सुरुवात करतात, हे लक्षात ठेवा.

सकाळी तोंड धुवावे. गणपतीला नमस्कार करावा. गणपतीची स्तोत्रे म्हणावी. संध्याकाळी आरती करावी. भूपाळी पाठ करावी. रोज भूपाळी म्हणावी. घराजवळ गणपतीचं देऊळ असेल तर घरच्यांच्या सोबतीनं देवळात जावं. देवदर्शन घ्यावं.

शब्दांचे अर्थ : प्रभात – सकाळची वेळ, वैखरी दाणी (बोलणे). चिंतणे – स्मरण करणे. सदाचार – चांगली वागणूक.

अर्थ : प्रत्येकाने सकाळी उठल्यावर रामाचे स्मरण करावे, देवांना नमस्कार करावा. घरात रामाची तसबीर असेल, तर रामरायालाही न विसरता नमस्कार करावा. नेहमी चांगली वागणूक ठेवावी. ज्याचे वागणे उत्तम असेल तो जगात सर्वांना आवडतो, तो रामरायांना आवडतो तो धन्य होतो.

देवाची आठवण ठेवावी. प्रभु रामरायाचीही आठवण ठेवावी. त्यांच्याप्रमाणेच नेहमी खरे बोलावे. घरातील वडील माणसांची आज्ञा पाळावी. आपला अभ्यास नीट करावा.

शब्दांचे अर्थ : जगी सर्व लोकांत, सर्व जगात. पूर्वसंचित नशिबात असलेले, भोगणे – सोसणे, अनुभवणे.

अर्थ : या जगात सर्व सुखें मिळणारा कुणीही नाही. मानवा, या गोष्टींचा विचार कर. आपल्या नशिबात जे जे असेल, तेच मिळेल. जे मिळेल त्यातच समाधान मानून रहायला हवे!

आपली वागणूक नेहमी चांगली ठेवावी. वाईट गोष्टी घडू नयेत. कधी खोटे बोलू नये. कुणाला फसवू नये. रोज देवाची मनापासून भक्ती करावी.

शब्दांचे अर्थ: सर्वथा – सतत, सदोदित. सत्य – खरे, मिथ्य – खोटे, बाचे तोंडाने, वदावे – बोलावे.

अर्थ : रामदास स्वामी सांगतात.. प्रत्येकाने नेहमी खरेच बोलावे. खोटे कधीच बोलू नये. खोट्या बोलण्याने वाद वाढवू नये. जे खरे असेल तेच शेवटी टिकेल. खोटेपणाने सांगितलेली गोष्ट टिकणार नाही. खोटे बोलून मनाची फसवणूक होते.

लहानपणापासून खरे बोलण्याचीच सवय करावी. खोटे बोलून कुणालाच फसवू नये. लहानपणी चांगली सवय लागली की ती पुढेही टिकते, हे कुणी विसरू नये. शाळेतसुद्धा कधी खोटे बोलू नका.

अर्थ : हे मानवा, तू श्रीरामाची नेहमी भक्ती कर. मारुती त्यांचा भक्त होता. तसाच तो रामप्रभू सर्वांचा महाराज आहे. सर्वांचं हित करणारा आहे. तो तुझेही कल्याण करील, ही खात्री असू दे.

प्रभू रामरायाची भक्ती करावी. तशीच मारुतीची भक्ती करावी. तो मारुती बल (शक्ती) वाढविणारा आहे. तुम्हीही खूप व्यायाम करा. ताकद वाढवा. घराजवळ मारुतीचे देऊळ असेल, तर रोज दर्शन घ्या. निदान शनिवारी तरी चुकू नका. खूप बलवान झालात, की तुम्ही धीट बनाल!

शब्दांचे अर्थ: समर्थ रामदास, सेवक – भक्त (सेवा करणारा), लौकिक – कीर्ती, नुपेक्षी लीला हयगय करीत नाही.

अर्थ : प्रभु रामचंद्रांच्या भक्तांकडे वाईट दृष्टीने कुणीच पाहाणार नाही. तसे पहाण्याची कुणालाच इच्छा होणार नाही. तिन्ही लोकांत (स्वर्ग, मृत्यू पाताळ) प्रभु रामचंद्रांचा लौकिक, त्यांचे चारित्र्य सर्वांना पटलेले आहे. असा थोर, दयाळू राम आपल्या भक्ताला कधीच दूर लोटणार नाही. त्याला अडी-अडचणींतून सोडवील. त्याचे रक्षण करील. त्याला चांगले विचार सुचवील.

प्रभु रामरायाची नेहमी आठवण ठेवावी. आपली वागणूक चुकत असेल, तर ती सुधारावी. अडचणीच्या वेळी रामरायाची मनापासून आठवण करावी. त्यांचे नाव मनात घेत असावे. आपण कुणाकडेही वाईट बुद्धीने पाहू नये. असे वागलात तर मोठेपणी तीच सवय टिकून राहील.तुमचे कल्याण होईल.

शब्दांचे अर्थ : शिळा – पाषाण, दगड. मुक्त – मोकळी, पद – पाय, दिव्य – सुंदर, शीणली – थकली, वाणी विचार, बोलणे.

अर्थ : प्रभु रामरायांचा अधिकार फार मोठा होता. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, शापामुळे जंगलात शिळा (दगड) होऊन पडली होती. त्याच पायवाटेनं प्रभु रामचंद्र जात होते. त्यांचे पाय त्या शिळेला लागले. शिळेचे रूप एकदम बदलले त्या शिळेतून एक तेजस्वी स्त्री बाहेर पडली. तीच अहिल्या ! तिने प्रभु रामरायांचे पाय धरले. नंतर आपल्या आश्रमात गेली. गौतम ऋषीना खूप खूप आनंद झाला. असा होता रामरायांचा विलक्षण प्रभाव!

प्रभु रामरायांचा मोठेपणा नेहमी लक्षात ठेवावा. आपण सर्वच बाबतीत फार लहान आहोत हे विसरू नये. खूप शिकावे. खूप वाचावे. आपणही मोठे होण्याचा प्रयत्न करावा; पण देवाला विसरू नये. सर्वांपेक्षा तो देवच श्रेष्ठ असतो. गावात रामरायाचे देऊळ असेल, तर त्या देवळात जाऊन राम-लक्ष्मण व सीता यांचे दर्शन घ्यावे. रामरक्षा पाठ करावी. रोज संध्याकाळी ती म्हणावी.

शब्दांचे अर्थ : अंतरी मनात भाव भावना, वसे राहील. अनन्य – दुसरा, रक्षीतसे – रक्षण करतो, राखतो. चक्रपाणी प्रभुराम, नुपेक्षी – सोडीत नाही, कदा कधीही. रामदासाभिमानी रामाबद्दल आदर वाटणारा.

अर्थ : माणसाच्या मनात देवाबद्दल जशी भावना असेल, तसेच त्याला फळ मिळेल. चांगली इच्छा असणारांना चांगले, वाईट इच्छा असणारांना वाईट! मग तो देव कोणताही असो. त्याची मनापासून भक्ती करा. तो आपल्या भक्तांचे नेहमी कल्याणच करील. कुठल्याही क्षणी तो धावून येईल. (पण तो दिसणार मात्र नाही). तो तुमची सर्व संकटे दूर करील! लहान वयात हे पटणार नाही, पण मोठे झालात की कळेल, पटेल.

देवाची नेहमी भक्ती करावी. देवावर विश्वास ठेवावा. घरातून कुठेही बाहेर जाताना देवांना नमस्कार करून जावे. बाहेर जातानाही रामरायाचे स्मरण करावे. मनातील इच्छा पूर्ण होतील.

शब्दांचे अर्थ : रघुराज – राम, अंकित सेवेत, अवज्ञा – आज्ञा न मोडणे, यदर्थी या बाबतीत, न कीजे कधीच होऊ नये, बस्ति – जवळ रहाणे.

अर्थ : समर्थ रामदास स्वामी प्रत्येक भक्ताला सांगतात, की तू नेहमी रामरायाची भक्ती कर. प्रार्थना कर. त्याच्याच सेवेत रहा. नेहमी मनापासून सेवा केली, तर त्याने तुझे हितच होईल. त्याची आज्ञा मोडील तो दुःखी होईल. म्हणूनच रामरायाला कधीच विसरू नको. नेहमी तो तुझ्या मनात आळवीत रहा.

ज्या देवाची तुम्ही भक्ती कराल, ती अगदी मनापासून करा. तशीच रामरायांचीही आठवण विसरू नका. गावात रामाचं देऊळ असेल. तर घरच्या मंडळींबरोबर देवळात जा. प्रभूरामचंद्रांप्रमाणे नेहमी खरे बोलण्याची सवय ठेवा. वडील मंडळींच्या आज्ञा पाळा. प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणानं सतत सोबत केली. तुम्हीही तुमच्या भावंडांना सोबत करा. भांडू नका. सर्वांनी प्रेमाने वागा.