rishi panchami vrat katha । ऋषिपंचमी व्रत कथा

rishi panchami vrat katha

ऋषी पंचमी मुहूर्त 2024

२०२४ मध्ये ऋषी पंचमी व्रताचा(भाद्रपद शुद्ध पंचमी) मुहूर्त रविवार, 8 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:06 ते दुपारी 01:33 पर्यंत पूजेचा मुहूर्त आहे. त्याचा कालावधी 02 तास 27 मिनिटे आहे.

ऋषी पंचमी तिथी ०७ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:३७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७:५८ वाजता संपेल.

ऋषी पंचमी व्रत आणि पूजा कशी करावी

rishi panchami vrat katha and vidhi

संतकवी दासफुले कृत ऋषिपंचमीची पूजा: ऋषिपंचमीला पाच प्रकारच्या किंवा २१ प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाचे वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करावे. आपल्या भारतातल्या जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणून ऋषिपंचमी हा सण साजरा करतो.

सप्तर्षी, अरुंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करावी. सप्तर्षीच्या सात, अरुंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपाऱ्या मांडून पूजा करतात. महिलांनी या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काही खायचे नसते. गाईचे दूध पीत नाहीत. असे करणे ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी फक्त उपवास करावा. ऋषिपंचमीचा उपवास व पूजा मुख्यतः विवाहित स्त्रियाच करतात, ज्याठिकाणी ऋषींची पूजा केली असेल त्याठिकाणी हळद-कुंकू वाहून यावे व प्रसाद घेऊन यावे. बाजारात ऋषीचे तांदू मीठ, मिरच्या, भाज्या, पीठ आदी पदार्थ मिळतात.

मुख्यत्वे करून खेडेगांवातील महिलांना हा उपवास शास्त्रोक्त पद्धतीने करता येतो. कारण घराच्या मागील बाजूस अंगणात भाजीपाला, वेल वगैरे लावता येतात. या दिवशी त्यांचा उपयोग करता येतो. वर्षभर आपल्याकडून अज्ञानीपणामुळे किंवा चुकून सोवळ्या ओवळ्याचे प्रमाद घडलेले असतील तर त्यांचे परिमार्जन म्हणून हा उपवास शक्यतो शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करावा. बैलाच्या कष्टाने न केलेल्या उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. म्हशीचे दूध व त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत.

धुतलेल्या तांदुळांवर ऋषिपंचमीच्या सुपाऱ्या मांडाव्यात. पूजा करणाऱ्या स्त्रीने पांढरे पातळ व पांढरा ब्लाऊज घालून सोवळ्याने पूजा करावी. ऋषिपंचमीचे व्रत घ्यावयाचे असल्यास प्रथम व्रत घेण्याचा संकल्प करून नवराबायकोनी पुण्याहवाचनपूर्वक हे व्रत करावे. नंतर ऋषींची पूजा करावी.

दुसऱ्या दिवशी मेहूण जेवावयास घालावे. पुण्याहवाचन करावयाचे झाल्यास आणखी ५० सुपाऱ्या जास्त लागतात. अशी सात वर्षे पूजा करून आठव्या वर्षी या व्रताचे होमहवन करून ब्राह्मणभोजन घालावे. ५/६/७ असे ब्राह्मण यथाशक्ती जेवावयास बोलवावेत. त्यावेळी ब्राह्मणभोजनासाठी स्वयंपाक नेहमीच्या सणाप्रमाणेच करावा.

rishi panchami vrat katha

।। श्री ऋषिपंचमी व्रत कथा ।।

ऋषी-मुनींनो ऐका ही तुमची कथा. आटपाट नगरात एक शीलवान ब्राह्मण रहायचा. शेतीभाती करायचा, पोथी पुराण वाचायचा, सोहळं ओहळं राखायचा. एकदिवस असं घडलं त्याची पली शिवेनाशी झाली. परंतु तिने आपला विटाळशीपणा लपविला. ती तशीच विटाळलेल्या स्थितीमधे घरामधे वावरू लागली.

विटाळामधेच तिने स्वयंपाक केला. आपल्या नवऱ्याला जेवण दिले त्यामुळे नवरा भ्रष्ट होऊन त्याच्या पुण्यकर्माचा -हास झाला. त्याचे अनुष्ठानयुक्त तप भंग पावले. त्या पापकर्मामुळे तो पुढील जन्मी बैलाच्या योनीमधे जन्मला. त्याची बायको पण पुढील जन्मी कुत्रीच्या योनीमध्ये जन्मली. विशेष म्हणजे दोघांनाही जन्म आपल्या मुलाच्याच घरी प्राप्त झाला. मुलगा मोठा धार्मिक आणि देवधर्म, पूजापाठ, अनुष्ठान करायचा.

आल्या-गेल्या ब्राह्मणाची वास्तपुस्त करायचा, त्याची पत्नीसुद्धा त्याच्यासारखीच धार्मिक पतीव्रता होती. एकेदिवशी त्याच्या आईचे श्राद्ध आले. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की आज आपल्या घरी श्राद्ध आहे. खीरपूरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता असून देवधर्मी व सत्संगी चांगली गृहीणी होती. तिने मोठ्या भावभक्तीनं स्वयंपाक केला.

चार भाज्या अनेक चटण्या, सुवासिक खीर केली. पण गडबडीत तीने खिरीचे भांडे उघडेच ठेवले त्यात सपनि गरळ टाकलं. हे त्या कुत्रीने पाहिलं. त्या कुत्रीला असं वाटलं ब्राह्मण खीर खातील आणि मृत्युमुखी पडतील आपल्या मुलास ब्रह्महत्येच पातक लागेल. म्हणून ती तुरुतुरु चालत गेली. खीरीच्या भांड्याला तोंड लावले. ब्राह्मणाच्या बायकोनं ते पाहिलं. तिला खुप राग आला. तीने जळतं लाकुड घेऊन तिच्या पेचकाडात हाणलं.

तो खीरीसह सगळा स्वयंपाक बाटला असे वाटून तीने तो फेकून दिला. पुन्हा आंघोळ केली, पुन्हा संपूर्ण काळजीपूर्वक स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातल. कुत्रीला घरात देखील येऊ दिल नाही. संपूर्ण दिवस उपवास घडला. रात्र झाली, ती भुकेजली होवून आपल्या बैल असलेल्या नवऱ्यास म्हणाली सगळ्यांना जेवण दिले परंतु माझ्यासाठी श्राद्ध असून मला एक घास सुद्धा खावू घातला नाही. असे म्हणून ती ओक्साबोक्सी रडू लागली.

त्यावेळी आपल्या पूर्वजन्मात पत्नी असलेल्या आणि या जन्मी कुत्री झालेल्या पत्नीस तिचा या जन्मीचा बैलयोनीत जन्मलेला पती म्हणाला, त मागच्या जन्मी रजस्वला असतांना मला न सांगता जेवू घातले, एवढेच नव्हेतर संपूर्ण घरादारात वावरली त्यामुळे सर्व भ्रष्टाचार होऊन सर्वच पुण्यकर्म पापमय होऊन आपणास दुर्गती प्राप्त होऊन तू कुत्री झालीस आणि मी बैल झालो आणि आपले कुकर्म योगे भोग भोगत आहोत.

कुकम करतांना विचार केला नाही परंतु आता त्या कुकर्माचा भोग भोगतांना मात्र रडतेस आणि आपल्याच मागील जन्माच्या पुत्रासही अधोगतीस नेतेस, याला सर्वस्वी तूच दोषी आहेस. म्हणून तुला क्लेश भोगणे प्राप्त झालेत. त्याविषयी खंत करू नकोस. हे शब्द जेव्हा तिच्या पतीने उच्चारले तेव्हा तिचा मुलगा संपूर्ण ते मागील जन्मीचे कुकर्म ऐकत होता. त्याला अतिशय दुःख प्राप्त झाले. तो ऊठला आणि आपली मागील जन्मीची आई असलेल्या या जन्मीच्या कुत्रीस अन्न दिले व पित्याला चारा टाकला.

परंतु त्यांचे भोग संपविले पाहिजेत या एका विचाराने तो चिंताक्रांत होऊन रानात फिरू लागला. तेव्हा एका अरण्यात त्याने ऋषींचा मेळा पाहिला, तो थांबला, त्यांना साष्टांग दंडवत घालून त्यांच्या शरणांगत गेला. तेव्हा त्या ऋषी मंडळींनी त्याचे मनोगत विचारले तेव्हा तो म्हणाला, मागील जन्मी माझ्या आईवडिलांकडून भ्रष्टकर्म घडले ते असे माझी आई विटाळसी असतांना तिने माझ्या पित्यास स्वयंपाक करून जेवू घातले व घरात वावरली.

त्याने आई कुत्री व वडिल बैल होऊन कुकर्म भोगतांना मी पाहिले. तेव्हा त्यांचे कर्म भोग सरावेत आणि त्यांना त्या कुकर्मातून मुक्ती मिळावी यासाठी आपण मला मार्गदर्शन करावे. तेव्हा ऋषी म्हणाले, या भूलोकी ऋषीपंचमी व्रत केले असता रजस्वलेकडून झालेल्या भ्रष्टाकर्मातून या जीवाची मुक्ती होते. तेव्हा तू ऋषीपंचमी व्रत कर.

तेव्हा तो मुलगा म्हणाला ते व्रत कसे करावे याची आपण मला संपूर्ण माहिती सांगावी म्हणजे मी ते आचरण करील व माझ्या आईवाड, ना त्यांचेकडून घडलेल्या भ्रष्टकर्मातून त्यांची मुक्ती साधेल. तेव्हा ऋषी म्हणाले, भाद्रपद महिन्यामध्ये ऋषीपंचमी येत असते.

चांदण्या पाखातली पंचमी असते त्या दिवशी हे व्रत करावे. ऐन दुपारी नदीवर जावून आघाड्याची प्रार्थना करावी. त्यांच्या काष्ठानं दंत धावन करावे, आवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसांना लावावं मग आंघोळ करावी, धुतलेले वस्त्र नेसावे. स्वतःच्या घरी पवित्र ठिकाणी अरुंधतीसह सप्तऋषीची पूजा करावी.

असं सात वर्षेपर्यंत व्रत करावे. शेवटी व्रत उद्यापन करावे याची एकमेव विशेष फलश्रुती म्हणजे रजस्वलादोषातून दोषी व्यक्ती दोषमुक्त होते. अनेक पापातून मुक्तता लाभते. भ्रष्ट जीवन नष्ट होऊन पुण्यवंत कुळी जन्म प्राप्त होतो. अनेक तिर्थांच्या स्नानाचे पुण्य प्राप्त होते. विविध प्रकारच्या दानाचे पुण्य लाभते.

मनोरथ पूर्ण होते, मुलाने हे व्रत केल्याने त्याचे पुण्य आई वडिलांना प्राप्त होते. रजस्वला दोषातून या जीवाला मुक्ती प्राप्त होते. हे ऐकल्यानंतर त्या मुलाने ऋषीपंचमीचे व्रत आचरण केले तर काय नवल ! आकाशातून विमान उतरले आणि बैल झालेला पिता अत्यंत सुंदर पुरुष झाला.

कुत्री असलेली आई पुण्य प्रभावाने सुंदर, सुशिल स्त्री झाली. पार्षदांनी त्यांना विमानात बसवून स्वर्गात नेले. मुलाच्या ऋषीपंचमी व्रताला फलश्रुती प्राप्त झाली. तशीच प्रत्येक ऋषीपंचमी व्रत धारकास फलश्रुती प्राप्त व्हावी. ही साठा उत्तरांची कथा पाचाउत्तरी सुफल सफल संपूर्ण.

rishi panchami vrat katha PDF

सप्तऋषींची आरती

(चाल – जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती)

Leave a comment