chote suvichar । मराठी छोटे सुविचार

Chote Suvichar: या पोस्ट मध्ये आपण छोटे सुविचार(chote suvichar) पाहणार आहोत. या मध्ये काही संस्कृत सुविचार(sanskrit suvichar) पण आहेत. हे सुविचार फळ्यावरचे सुविचार देखील आहेत.

Marathi Suvichar Short

१. विद्या विनयेन् शोभते.

२. सत्यं शिवं सुंदरम्।

३.आई हीच बालकाची पहिली गुरू आहे.

४. मातृ देवो भव।

५. प्रेम ही एक प्रभावी शक्ती आहे.

६. खोट्या स्वप्नापेक्षा कटू वस्तुस्थिती चांगली.

७. आई सारखं दुसरं दैवत जगात नाही.

८. आई-वडील गुरुजन ह्यांचा मान राखा.

९. संयम तुम्हास अमर्याद अधिकार देईल.

१०. इतरांना सुख देणे हेच महादान.

११. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.

१२. व्यक्तीने सालस असावे, मूर्ख नव्हे.

chote suvichar

१३. विद्या हेच धन.

१४. जे दान दिल्याने संपत नाही, तर उलट वाढत जाते, ते दान म्हणजे विद्यादान.

१५. माता ही प्रेमाची सरिता आहे.

१६. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.

१७. कठीण समय येता कोण कामास येतो.

१८. आईची माया अन् पित्याचं प्रेम हे पैशाच्या तराजूत मोजू नका.

१९. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

२०. शाळा हे सरस्वतीचं मंदिर आहे. ते स्वच्छ ठेवा. त्याचे पावित्र्य राखा.

२१. लक्षात ठेवा! आई-वडिलांची आज्ञा पाळा.

२२. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

२३. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

२४. अधिक मित्र हवे असतील, तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.

२५. सद्‌गुणांची बेरीज अन् र्दुगुणांची वजाबाकी करा.

२६. जीवनाच्या गणितात समाधानाचा हातचा विसरू नका.

२७. वाचन, मनन अन् पाठांतरानेच नीट अभ्यास करता येतो.

२८. पुस्तकी ज्ञानाचे धडे जीवनाच्या अनुभव शाळेत गिरवा.

२९. जिवाचं रान केल्याशिवाय ज्ञानाची बाग फुलत नाही.

३०. न पाळता येणारा शब्द देऊ नका.

३१. आपण गोड बोललो कि, आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात.

३२. शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा.

chote suvichar

३३. मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत, ती म्हणजे आई.

३४. स्वामी तिन्हीं जगांचा आईविना भिकारी.

३५. जीवनाचा पतंग आशेच्या दोऱ्यावर विरहत असतो.

३६. श्रद्धा असेल तर दगडांतही देव दिसतो.

३७. गरज ही शोधाची जननी आहे.

३८. कल्पनेपेक्षा अनुभव महत्त्वाचा असतो.

३९. देव दगडात नव्हे तर माणसात पहा.

४०. तुमच्या जीवनाचे गाणे, तुम्हीच सुरेल बनवा.

४१. अहंकाराने फुगलेला माणूस क्षमा मागण्यासाठी कचरतो.

४२. जीवनातला आनंद इतरांबरोबर वाटून घेणे ही सर्वात मोठी सेवा होय.

४३. दुःखाचे ढग मनातच राहिले तर डोळ्यांतून पाणी वाहू लागते.

४४. तुमची सदसद् विवेकबुद्धी ही चांगला मित्र आहे. तिचे वारंवार ऐकत जा.

४५. साधेपणात मोठे सौंदर्य असते.

४६. तुमची दृष्टी जर तुम्ही उन्नत ठेवाल तर तुमचे मस्तक आपोआपच उन्नत राहील.

४७. तुमचे आज खोटे बोलणे हेच उद्या तुम्हास खोटे बोलायला भाग पाडील.

४८. सदाचरणी राहणे म्हणजेच पापकर्मापासून मुक्त राहणे.

४९. जगा आणि जगू द्या.

५०. जबाबदारी माणसाला प्रौढ बनविते.

५१. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.

५२. मित्र ओळखा-मैत्री वाढवा अन् जपाही.

५३. आनंद हा भोगात नसून त्यागात आहे.

५४. दान हा हाताचा गौरवशाली दागिना आहे.

५५. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.

५६. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही.

५७. मरावे परि कीर्ती रूपे उरावे.

५८. दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास.

५९. खरा मित्र मिळवण्यासाठी आपले अंत:करण द्यावे लागते.

६०. उद्या करायचं ते काम आज करा, अन् आज करायचे काम आत्ताच करा.

६१. प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग एकच आहे व तो म्हणजे अंधार.

६२. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले.

६३. दुःखाचा कडेलोट म्हणजे सुखाची पहाट होय.

६४. सत्यमेव जयते.

६५. सत्याला सतत सामोरे जा.

chote suvichar

६६. सत्य सांगायला भिऊ नका.

६७. उद्योगाचे घरी लक्ष्मी तेथे वास करी.

६८. निरोगी मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे.

६९. प्रयत्ने वाळूचे कन रगडता तेलही गळे.

७०. जो अधिक शिकेल तो सूर्यासारखा चमकेल.

७१. विद्येवाचून जीवन व्यर्थ आहे.

७२. ज्याला आपल्या अज्ञानाची अखंड जाणीव आहे तोच खरा ज्ञानी होय.

७३. लवकर उठे, लवकर निजे त्याला विद्या, बल, संपत्ती मिळे.

७४. चांगल्या विद्येचे संपादन हेच सुखाचे साधन.

७५. गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे.

७६. माता आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.

७७. दुर्लक्ष, घाई, स्तुती अन् आळस ही अभ्यासातली अडचण आहे.

७८. चारित्र्याचा विकास हेच सर्वात मोठे शिक्षण आहे.

७९. मुले ही देवाघरची फुले आहेत.

८०. जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.

८१. शिक्षण हे उत्कर्षाच्या इमारतीचा पाया आहे.

८२. विद्यादान हे उत्तम दान आहे.

chote suvichar

८३. जेथे शब्दांचा सुकाळ तेथे बुद्धीचा दुष्काळ.

८४. क्षमा हे ज्ञानाचे भूषण आहे.

८५. मानवता हाच खरा धर्म आहे.

८६. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते.

८७. आज्ञाधारकपणा ही सुयशाची जननी आहे.

८८. काय वाचतो ह्यापेक्षा काय लक्षात राहते, ह्यावरच हुषारी अवलंबून असते.

८९. तोंडून गेलेला शब्द आणि निघून गेलेली वेळ परत येत नाही.

९०. चारित्र्य हा आरसा आहे, तो स्वच्छ ठेवा.

९१. संस्काराचे बीजारोपण हे बालपणाच्या ओल्या मातीतच होते.

९२. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, तर संस्काराने तो सुसंस्कृत होतो.

९३. स्वाभिमानी असा, अभिमानी होऊ नका.

९४. वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका.

९५. हृदयातला माणुसकीचा झरा आटू देऊ नका.

९६. लोभी नको, निर्लोभी व्हा.

९७. मौनं सवार्थ साधनम्।

९८. चांगले वाचन, चांगले विचार अन् चांगले आचरण ठेवा.

९९. नाती रक्ताची नकोत, मना मनांची जोडा.

१००. दिल्या वचनाला जागा.

१०१. बोलताना विचारपूर्वक, ठाम अन् स्पष्ट बोला.

१०२. अपयशाच्या चिखलात पाय रोवल्याशिवाय यशाचं कमळ हाती येत नाही.

१०३. आनंद हा भोगात नसून त्यागात आहे.

१०४. निःस्वार्थी बुद्धीने केलेले कर्तव्य कधीही वाया जात नाही.

१०५. दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घाला.

१०६. विद्या हेच धन.

१०७. जीवनात कला नसेल तर ते विफल ठरेल.

१०८. तोडणे सोपे, जोडणे मात्र अवघड.

१०९. हसा आणि इतरांना हसवत रहा.

११०. मूर्खाच्या संगतीपेक्षा एकांत बरा.

१११. विनासहकार नही उद्धार.

११२. समाधान हे श्रेष्ठ धन आहे.

११३. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.

११४. अति परिचयात अवज्ञा.

११५. अति तेथे माती.

११६. चव ही जिभेला नसून ती मनाला असते.

११७. मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र किंवा शत्रू असतो.

११८. जीवन हे एक आव्हान आहे. ते स्वीकारा.

११९. पुस्तकांची नीट निगा राखा.

१२०. ग्रंथ हेच गुरू.

१२१. इच्छा तेथे मार्ग.

१२२. शिक्षण हा जीवनाचा आत्मा आहे.

१२३. जीवन हा सुखाने भरलेला पेला नसून, ते कर्तृत्वाने भरायचे माप आहे.

१२४. सुख हे पैशावर अवलंबून नाही.

१२५. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.

१२६. पायदळी चुरगाळली जाणारी फुलं ही चुरगाळणाऱ्या पायांना सुगंध देतात.

१२७. आनंदी वृत्ती अन् सात्विक समाधान ही खरी सौंदर्यवर्धक साधने आहेत.

१२८. ज्याला इतिहासाचे विस्मरण होते तो इतिहास घडवू शकत नाही.

१२९. दुसऱ्याचे अवगुण न पाहता, त्याच्या अंगचे सुंदर, चांगले गुण पहा.

१३०. एकी हेच बळ.

१३१. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.

१३२. माणसाची प्रतिष्ठा हृदयात आहे, डोक्यात नाही.

१३३. दुःख देवाला सांगावे, सुख देवाला मागावे.

१३४. माता, पिता, गुरू आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा होय.

१३५. जेथे स्वच्छता तेथेच ईश्वर.

१३६. समाधान ही परमेश्वराची देणगी आहे.

१३७. परमेश्वराचे दास होण्यात जो आनंद आहे, तो आनंद जगाच्या मालकीत नाही.

१३८. संत चालते बोलते देव आहेत.

१३९. अहिंसा हाच खरा धर्म.

१४०. व्यसन म्हणजे दैन्य, दुःख, दारिद्र्य व रोग यांना आग्रहाचे खास आमंत्रण.

१४१. स्वाभिमान हा सर्व सद्गुणांचा पाया आहे.

१४२. इतरांना सुख देणे हेच महादान आहे.

१४३. स्वातंत्र्याचा उद्भव मनात होतो, दोरखंड कापून नाही.

१४४. गोड स्मित कोणतीही अडचण चटकन दूर करते.

१४५. एकतेत सामर्थ्य, बळ आणि शक्ती ह्याचं दर्शन आहे.

१४६. एखादे अवघड कार्य प्रेमभावनेने केले तर यश तात्काळ मिळते.

१४७. चंदनाचे झाड तोडले, तरी ते सुगंध देणे सोडत नाही.

१४८. वेळ वाया घालवणे म्हणजे टप्प्याटप्प्याने केलेली आत्महत्या आहे.

१४९. एकदा गेलेली वेळ परत येत नाही.

१५०. मंगल मन हे प्रभूचं मंदिर आहे.

१५१. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा.

१५२. प्रेमाचा एक शब्द कित्येक दुःखी मनांचे सांत्वन करू शकेल.

१५३. विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसाला महान बनवीत असते.

१५४. एक टनभर क्लेश दूर करण्यास फक्त एक औंस धैर्य लागते.

१५५. सदैव आनंदी, उत्साही अन् हसतमुख रहा.

१५६. उत्साही पुरुष कोणत्याही परिस्थितीत खचून जात नाही.

१५७. माणसाच्या इच्छेशी दैव नेहमीच खो-खोचा खेळ खेळत असतो.

१५८. ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा म्हणजे खरा विजय होय.

१५९. आपली दुःखे विसरण्यासाठी ईश्वराचे स्मरण करा.

१६०. नम्रतेने जुळते घेणाऱ्यापाशीच फार मोठेपण असते.

१६१. माणूस जन्माने नव्हे, तर कर्माने मोठा होतो.

१६२. आशावादी विसरण्यासाठी हसतो आणि निराशावादी हसण्याचे विसरतो.

१६३. जर ज्ञान संपत्ती आहे, तर स्वतःला विचारा “मी किती संपत्तीवान आहे.”

१६३. प्रेम आणि सौजन्य अपेक्षू नका, उलट ते इतरांना द्या.

१६४. शांती सापडायला फार कठीण आहे कारण ती आपल्या आत आहे.

१६५. इतरांची वाट पाहण्याची जर तुमची सवय असेल तर तुम्ही मागे पडाल.

१६६. यश हे मनाच्या शांतीतून उगम पावत असते.

१६७. मायेनं भरलेलं मन असेल तर सुख कोठेही पळून जात नाही.

१६८. जन्माचा अंत म्हणजे मृत्यू, अन् मृत्यूचा अंत म्हणजे जन्म होय.

१६९. आळस म्हणजे जीवनमृत्यू आणि क्रियाशीलता म्हणजे जीवन संजीवनी.

१७०. जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र चालू होते.

१७१. श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नको.

१७२. पुस्तकातले अक्षर वाङ्मय अक्षय जपा.

१७३. मुलांनो ! तुम्ही केवळ परीक्षार्थी होऊ नका, खरे ज्ञानार्थी बना.

१७४. अवघड विषय पुन्हा पुन्हा वाचा, समजून घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

१७५. लेखन, वाचन अन् श्रवणाने विचार प्रगल्भ होतात.

१७६. कला आणि कलाकार ह्यांचे कौतुक करा.

१७७. कलेचे मोल पैशात मोजू नका.

१७८. हक्कांचा आग्रह धरताना कर्तव्याचा विसर पडू देऊ नका.

१७९. असे लिहा की जे दुसऱ्याला वाचता येईल.

१८०. अक्षर गिरवून वळणदार, डौलदार अन् देखणं बनवा.

१८१. जो शांतवृत्ती धारण करतो त्याला कोणीही फसवू शकत नाही.

१८२. खरे तापमान नियंत्रण म्हणजे क्रोधाग्नी विझवणे.

१८३. कल्पनाशक्ती ही हिंस्र सिंहासारखी आहे. तिला मोकाट धावू देऊ नका.

१८४. तुम्ही जितके कमी बोलाल तितके जास्त लोक तुमचे ऐकतील.

१८५. मान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी इतरांचा मान राखणे.