hanuman kavach । हनुमान कवच

Panchmukhi Hanuman Kavach

hanuman kavach Lyrics

ह्या मूलमंत्राचा उपासकास पुढील प्रकारे फायदा होतो –

१) पहिल्या मंत्राच्या जप-पठणाने शत्रूचा नाश होतो.

२) दुसऱ्या मंत्राने भूत-पिशाचाची बाधा दूर होते.

३) तिसऱ्या मंत्राने रोग निवारण व विषबाधा-परिहार होतो.

४) चौथ्या मंत्राने संतती व समृद्धीसह संपत्तीची अभिवृद्धी म्हणजेच वाढ होते.

५) पाचव्या मंत्राने लोक आपलेसे होणे, वेदविद्येचा लाभ होणे इ. फले मिळतात.

अर्थ: महाबली श्री हनुमान, जो अंजनीचा पुत्र आहे, जो थोर पराक्रमी आहे, ज्याचा कुणीही कधीही पराभव केलेला नाही, जो सर्वही दिशांत शोभून दिसतो आहे, जो वज्रदेही आहे, जो सकल विश्वाचा चिंतनीय विषय आहे, जो रुद्राचा अवतार आहे, ज्याने लंका दहन केली, जो सागर ओलांडून गेला, ज्याने रामभक्तीच्या बळावर सागरावरही सेतू बांधला, ज्याने सीतामाईला सुटकेच्या आश्वासनासह धीर दिला, ज्याने दशमुखी रावणाची दहा-ही मुखे आक्रांत केली, अशा अतुल पराक्रमी हनुमंतास वंदन असो.

अर्थ: जो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, जो वायूचा पुत्र, अंजनीचा सुत अन् श्रीरामाचा दूत आहे, वानर सेनेला जो प्रिय आहे, ज़ो सुग्रीवाला त्याच्या कामात मदत करणारा आहे, जो पर्वत उचलून टाकणारा आहे, जो ब्रह्मचारी आणि धीर गंभीर वाणी बोलणारा आहे, अशा श्री हनुमंतास माझा नमस्कार असो.

अर्थ: सर्व प्रतिकूल ग्रहांचे निवारण करणाऱ्या, भवताप रोग दूर करणाऱ्या, डाकिनी-शाकिनींचा नाश करणाऱ्या हे हनुमंता! तुला माझे नमन असो. मी ही जी आहुती तुला अर्पण करतो आहे, तिचा तू स्वीकार कर.

अर्थ: हे महाबलशाली, दोषनिवारका, दुष्ट ग्रह आणि नाना भवरोग उच्चाटका, भूत-प्रेत-पिशाच्चतापनिवारका, बलशाली बलवान श्री वीर हनुमाना, तुला माझा नमस्कार असो. मी अर्पण करीत असलेल्या ह्या आहुतीचा स्वीकार कर.

अर्थ: ॐ हे श्री बीर हनुमंता ! तुला माझा नमस्कार असो. भूत-प्रेत-पिशाच्च ह्यांच्यामुळे आलेला ताप, विषमज्वर, एक-दोन-तीन-चार दिवसांचा ताप, थंडी भरून आलेला ताप, कळत-नकळत विष्णू महेशादिक देव- देवतांचा हातून घडलेल्या प्रमादाचा ताप, इ. नानाविध भवतापांचा तू नाश करणारा आहेस, तेव्हा हे बलवीरा, तू माझ्या ह्या सर्व तापांचा नाश कर. भूत-प्रेत, पिशाच्च, यक्ष, राक्षस आणि वेताळ ह्या सर्वांचे तू उच्चाटन कर. तुझ्या नामाबरोबर मी ही जी आहुती तुला देत आहे, त्या आहुतीचा स्वीकार कर.

अर्थ: हे भगवान श्री हनुमंत वीरा ! तू माझा नमस्कार स्वीकार कर. तू वेगी ये… हो हो… तू वेगी ये आणि ही आहुती घे.

अर्थ: हे वायुपुत्र हनुमाना ! माझा नमस्कार घे. डाकिनी, शाकिनी, मोहिनी, इ. चा तू पराभव कर. सर्व विषाचासुद्धा नाश कर. सर्व दुःख, आपदा, क्लेष, ताप हे दूर घालव. ह्या आहुतीचा स्वीकार कर.

अर्थ: हे वीर हनुमाना! तुझ्या चरणी वंदन करून मी तुला अशी प्रार्थना करतो की, हे बलभीमा, हिंस्र श्वापदे, दुष्ट व्यक्ती, दुष्ट शक्ती, कुटिल प्रवृत्ती ह्यांचा नाश करण्यासाठी तू त्यांचेवर आक्रमण कर; आक्रमण कर.

अर्थ: ह्या मंत्रपठणाबरोबर इथे एक आहुती देऊन त्या पंचमुखी हनुमानास अशी प्रार्थना करा की “हे देवते, तू सर्व रोगांचे असे निवारण कर की, त्यांच्यावरच आक्रोश करण्याची वेळ येऊ दे. शत्रूचे मर्दन करून त्यांचा उन्माद दूर कर, नष्ट कर; आणि त्यांचा संहार कर. तू त्यांना मार. त्यांना मार. त्यांचे शोषण कर, हनन कर, दहन कर आणि त्यांना मारून सर्व रोगांचा समूळ नायनाट कर. मी देत असलेली ही आहुती घे… घे… घे…

अर्थ: हे महाबली वीर हनुमाना! तू माझ्या सर्व संकटांचे, शत्रूचे निवारण कर. त्यांची दाणादाण उडव. मला सर्व कार्यात उत्तम यशप्राप्ती होऊ दे. मला बंधमुक्त कर. विविध प्रकारच्या कारागृहांतून मला मुक्त कर.

अर्थ: हे महाबली ! डोकेदुखी, कानदुखी, डोळे, काख आणि पाठदुखी इ. सर्व शारीरिक व्याधींचे तू निराकरण कर. तो सर्व त्रास दूर कर. माझ्या शत्रुकूलाचा समूळ संहार करून तू त्यांचा पूर्ण नायनाट कर.

अर्थ: हे बलभीमा ! तू नागपाशातून माझी मुक्तता कर. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, कालगुलिकय, पदम्, महापद्म, कुमुद इ. सर्वांचे; तसेच जलचर, निशाचर आणि भर दिवसा फिरणाऱ्या सर्व विषारी प्राण्यांचे तू विषच काढून टाक आणि त्या सर्वांना विषरहित कर.

अर्थ: तू आमच्या सर्व रोगांचे निवारण कर. राजसभा स्तब्ध कर. राजा, चोर आणि अग्नी ह्यांच्या भयापासून आम्हाला मुक्त कर.

अर्थ: कोणत्याही परतंत्र, परमंत्र, परयंत्र किंवा परविद्येस तू प्रकट होऊ देऊ नकोस. माझ्या सर्व विद्या ह्या प्रकट होऊ देत. विद्येला बुद्धी आणि विनय दे. माझ्या संकटांचा आणि सर्व शत्रूचा नाश कर. त्यांचा संहार कर.

अर्थ: हे बलवीर हनुमाना! माझे सर्व रोगांपासून, तसेच भूत-पिशाच्चबाधेपासून संरक्षण कर. त्या रोगांचे, बाधेचे निवारण कर. तुझ्या कृपेने जे अशक्य आणि असंभव, ते शक्य आणि साध्य होऊ दे. मी देत असलेल्या ह्या आहुतीचा तू स्वीकार कर. ती मान्य करून घे.

अर्थ: न्यायाने, नीतीने वागणारा आणि धर्माचरण करणारा मनुष्य जर हे पंचमुखी हनुमान कवच एकदा जरी म्हणेल, तरी त्याचे सर्व शत्रू नाश पावतात. दोन पाठ केले, तर त्याच्या शत्रूचा नाश होतो. तीन वेळा हे कवच म्हटल्यास सर्व सुखांचा व संपत्तीचा लाभ होतो. पाच वेळा पठन करणाऱ्यास पुत्र पौत्रदा लाभते. सहा वेळा पाठाने देव-देवता प्रसन्न होतात; तर सात पाठांनी सर्व मंगल घडते. आठ वेळा रोज हे स्तोत्र म्हटले, तर इष्ट कामनेची पूर्ती होते. नऊ पाठांचे फल हे प्रजा अनुकूलतेचे आहे; तर सतत दोन आठवडे रोज ह्या कवचाचे दहा पाठ केले, तर उपार काला त्रिकाल ज्ञान प्राप्त होते. तीन आठवडे जो मनुष्य रोज ह्याचे दहा आठ करो, तो आपल्या सर्व गणगोतासह तिन्ही लोकांत विजयी होईल. हे पंचमुखी हनुमंता ! तू आपल्या निज भक्तांचे सर्व बाधा, त्रिविध ताप-पाप ह्या सर्वांपासून रक्षण कर; ह्या सर्वांपासून त्याचे निवारण कर.

अर्थ: जर उपासकाने हे कवच पूजा करत असताना म्हटले, तर तो सर्व कार्यांत यशस्वी होतो. त्याची सर्व कार्ये पूर्ण होतात. इतकेच नव्हे, तर ह्या स्तोत्र-कवचाचे नुसते स्मरण जरी केले, तरी फार मोठे पुण्यफल पदरी पडते.

अर्थ: असे हे श्री सुदर्शन संहितेमधील रुद्रयामल ग्रंथातले अथवर्ण रहस्य प्रकरणातले श्री रामप्रभूना अतिप्रिय असणारे श्री पंचमुखी हनुमान कवच स्तोत्र इथे पूर्ण होते.

प्रभू रामचंद्राला हे स्तोत्र अर्पण असो.

hanuman kavach Pdf