meaning of manache shlok in marathi । मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ

meaning of manache shlok in marathi

meaning of manache shlok in marathi । मनाचे श्लोक अर्थ सहित

meaning of manache shlok in marathi
जय जय रघुवीर समर्थ !

meaning of manache shlok in marathi | Manache Shlok Lyrics

शब्दांचे अर्थ : आर्जवी – नम्रपणाने (गरीबीने), प्रिय – आवडतो, सर्वलोकी – सर्व लोकांना, सत्यवादी नेहमी खरेपणाने वागणारा, विवेक विचार. कदा कधीही, मिथ्य – खोटे.

अर्थ : जो सर्वांशी नेहमी नम्रपणानं वागतो. गोड बोलतो, तो खरेपणाने वागतो, जो कधीच खोटे बोलत नाही असाच भक्त मोठेपणी खरा मोठेपणा मिळवील. त्याला खरे समाधान वाटेल, असेच रामदास सर्वांना सांगत असत. असा भक्त रामरायांनाही प्रिय वाटेल!

शब्दांचे अर्थ : सज्जन – चांगले लोक, भक्तिपंथ – भक्ती करण्याची पद्धत (रीत), श्रीहरी – देव, पाविजेतो – प्रसन्न होतो, स्वभावे – सहज, निंय वाईट. जनी – लोकात, वंद्य – चांगले, सर्वभावे – मनापासून,

अर्थ : समर्थ सांगतात, हे मानवा, चांगले लोक (उत्तम वागणुकीचे ) ज्या रीतीने वागत गेले, तसाच तूही जा, म्हणजे देव तुझ्यावर कृपा करील. जगात ज्या ज्या वाईट गोष्टी असतील, त्या सर्व तू सोडून दे. ज्या चांगल्या गोष्टी असतील, त्याच मनापासून नेहमी करीत जा. तुझा सर्व काळ सुखात जाईल.

शब्दांचे अर्थ : वासना – इच्छा, दुष्ट – वाईट, कामा नये – हिताची नाही, सर्वथा – सतत (नेहमी), नीति चांगले नियम, अंतरी मनात, सारविचार चांगल्या गोष्टींचा विचार.

अर्थ : आपल्या मनात कधीही वाईट विचार नसावा. दुष्टवृत्तीही नसावी. पापबुद्धीही नसावी. नेहमी नीतीने म्हणजेच चांगले नियम लक्षात ठेवून वागावे. (ही शिकवण घरी मिळतेच). चांगले कोणते? वाईट कोणते? याचा आपल्या मनाशी नीट विचार करावा. नेहमी चांगल्या गोष्टींचेच अनुकरण करावे.

शब्दांचे अर्थ: संकल्प नेम (नियम). कल्पना – विचार, विषय दोष. घडे – घडते, छी-छी – फजिती.

अर्थ : मनात वाईट विचार कधीच येऊ देऊ नयेत. तसाच वागण्याचा नेम धरा. जे-जे चांगले असेल तेच मनात साठवून ठेवा व तसे वागा. मनात वाईट विचारांचा कधीच विचार आणू नका. जर तुमची वागणूक वाईट विचारांची-कृतीची दिसली, तर लोक तुमची छी-थू करतील. फजिती करतील. त्यामुळे तुम्हालाच नव्हे तर तुमच्या सर्व घरालाच तो कमीपणा वाटेल, हे लक्षात ठेवा.

शब्दांचे अर्थ : कल्पतरू – तुम्हाला हवी असेल ती वस्तू त्वरित देणारा एक वृक्ष, कामधेनू – तुम्हाला हवी असेल ती वस्तू त्वरित देणारी गाय, चिंतामणी – काळजी दूर करणारा, साम्यता – सारखेपणा.

अर्थ : समर्थ सांगतात, प्रभू रामचंद्र हे कल्पवृक्षासारखे किंवा कामधेनूसारखे, तुम्ही मागाल ते देतील. (ते फार मोठे अधिकारी आहेत.) रामाच्या सेवेत मन रमवा. त्यामुळे तुमची सर्व चिंता (काळजी) दूर होईल. प्रभू राम हे देवाचेच अवतार आहेत. त्यांच्या प्रेरणेने सर्व उत्तमच होत जाईल. त्यांच्या मोठेपणाशी कशाचीच तुलना करता येणार नाही, हे लक्षात ठेवा.

अर्थ : श्यामवर्णाचे प्रभु रामचंद्र दिसण्यात सुंदर आहेत. पराक्रमी आहेत. शांत आहेत. धीट आहेत. ते आपल्या सेवकांचे रक्षण करतील. अशा रामरायांचे नित्यनेमाने सकाळच्या वेळी स्मरण करावे. त्यांना मनोभावे नमस्कार करावा.

शब्दांचे अर्थ : सुखानंद सुख व आनंद देणारा, निवारी – नाहीसे करतो, भजावे भक्ती करावी, विवेके – विचारपूर्वक. त्यजावा – टाकावा, अनाचार – वाईट वागणूक, हेवा – मत्सर, द्वेष.

अर्थ : जो आपल्या मनातील भय घालवतो व मन आनंदी ठेवतो, त्या रामप्रभूना नेहमीच भक्तिभावाने आठवीत जावे. स्वतः विचार करून बाईट गोष्टी, द्वेष करणे सोडून द्यावे. नेहमी रामनामाच्या स्मरणाने तुम्हाला सद्‌दुद्धी मिळेल. म्हणून रोज सकाळी रामप्रभूची भक्ती करा.

शब्दांचे अर्थ : दोष – दुर्गुण, गती – चांगले गुण, पुण्यठेवा – पुण्याचा साठा (पुण्य वाढते).

अर्थ : प्रभू रामरायांचे नाव सतत घेत जाईल, त्याचे दोष दूर होतील. त्याला चांगली बुद्धी मिळेल. नामस्मरणाने पदरी पुण्य पडेल. भाग्यवान व्हाल. यासाठी सकाळी रामरायाचे नाव सतत घेत जावे.

शब्दांचे अर्थ : मुखी – तोंडाने, विश्राम शांतता. सदानंद – नेहमी मिळणारा आनंद, संदेह संशय. शोक – अस्वस्थता, निजधाम आपलं घर.

अर्थ : जो नेहमी राम-नाम म्हणत असेल त्याच्या मनाला शांतता मिळेल, याबद्दल मनात कुठलाही संशय (शंका) ठेवू नये. रामनामाच्या कृपेने सर्व दुःखे नाहीशी होतील. मनाची अस्वस्थता पूर्ण जाईल. सर्व घर आनंदी राहील.