Ram Raksha Stotra | रामरक्षा स्तोत्र: व अर्थ

Shri Ram Raksha Stotra

Ram Raksha Stotra
।। जय श्री राम ।।

Ramraksha Stotra Marathi रामरक्षा स्तोत्र

Ram Raksha Stotra Lyrics

श्रीगणेशाय नमः । अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य । बुधकौशिक ऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छंदः। सीता शक्तिः । श्रीमद्धनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।

अर्थ – श्रीगणेशाला माझा नमस्कार असो. या रामरक्षा स्तोत्ररूपी मंत्राचा द्रष्टा ऋषी बुधकौशिक हा आहे. या मंत्राची देवता श्रीसीताराम ही आहे. या मंत्राचा छन्द अनुष्टुप् हा आहे. या मंत्राची शक्ति सीता ही आहे. श्रीमत् हनुमान ही या मंत्राची किल्ली आहे; म्हणजे प्रथम श्रीहनुमंताला नमस्कार करून मी रामरक्षा स्तोत्रमंत्र म्हणत आहे. त्याचे फळ मला कृपा करून मिळावे. या मंत्राचा जप श्रीरामचंद्र प्रसन्न व्हावे, या हेतूने मी करत आहे.

| अथ ध्यानम् ।

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं। पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं । नानाऽलङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥ ॥ इति ध्यानम् ॥

श्रीरामरक्षास्तोत्राचा अर्थ

ram raksha stotra

Ramraksha Lyrics

गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या, धनुष्य-बाण (हातात) धारण केलेल्या, बद्धपद्मासन घालून बसलेल्या, पिवळं वस्त्र (पीतांबर) नेसलेल्या, ताज्या, टवटवीत कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर डोळे असलेल्या, प्रसन्न असलेल्या, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे दृष्टी लावलेल्या, (श्यामलवर्णाच्या) पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे कांती असलेल्या,अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित असलेल्या, मोठं जटामंडल धारण करणाऱ्या अशा प्रभू श्रीरामचंद्राचं मी ध्यान करतो.

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥

अर्थ : श्रीरघुनाथाचे (रामचंद्राचे) चरित्र शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे व त्यांतील एकेक अक्षरसुद्धा मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करणारे असे आहे.

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥ 

सासीतूणधनुर्बाणपाणिं- नक्तंचरान्तकम्।

स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुम् ॥३॥

अर्थ : नील कमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे व कमलासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या सन्निध सीता व लक्ष्मण आहे, जटांच्या मुकुटामुळे जो सुशोभित दिसत आहे, ज्याच्या एका हाती खड्ग, पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्यबाण आहे व जो राक्षसांचा नाश करणारा आहे, खरोखर जन्मरहित व व्यापक असूनही जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरिता सहज लीलेने रामरूपाने अवतीर्ण झालेला आहे, अशा प्रभूचे ध्यान करून पातकांचा नाश करणाऱ्या व सर्व कामना पुरविणाऱ्या या रामरक्षास्तोत्राचे सुज्ञ माणसाने पठण करावे. 

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।

‘शिरो’ मे राघवः पातु, ‘भालं दशरथात्मजः ॥४ ॥

अर्थ : सुविख्यात रघुराजाच्या वंशांत जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथराजाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ’ पातु, विश्वामित्रप्रिय: ‘श्रुती’ ।

‘घ्राणं’ पातु मखत्राता ‘मुखं’ सौमित्रिवत्सलः ॥५॥

अर्थ : कौसल्याराणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य असा राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. (विश्वामित्राच्या) यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. बंधु लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो.

‘जिव्हां’ विद्यानिधी: पातु, ‘कण्ठं’ भरतवन्दितः ।

स्कन्धौ दिव्यायुधः पातु, ‘भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

अर्थ : सर्व विद्या धारण करणारा राम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने ज्याला वंदन केले आहे, असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य अशी शस्त्रे ज्याच्यापाशी आहेत, असा राम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. शिवधनुष्याचा (सीतास्वयंवर प्रसंगी) ज्याने भंग केला आहे, असा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो.

‘करौ’ सीतापति: पातु, ‘हृदयं जामदग्यजित् ।

‘मध्यं’ पातु खरध्वंसी, ‘नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७ ॥

अर्थ : सीतेचा पती राम माझ्या हातांचे परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. जांबवानाला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे- बेंबीचे रक्षण करो.

सुग्रीवेश: ‘कटी’ पातु, ‘सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

‘ऊरू’ रघुत्तम: पातु, रक्षः कुलविनाशकृत् ॥८॥

अर्थ : सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभु राम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो. राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो.

‘जानुनी सेतुकृत्पातु, ‘जंङ्के’ दशमुखान्तकः ।

‘पादौ बिभीषणश्रीदः पातु, रामोऽखिलं वपुः’ ॥९॥

अर्थ : समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो आणि सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । 

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १० ॥

अर्थ : फलश्रुति – याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो मनुष्य पठण करील, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान् सर्व कार्यांत विजय मिळविणारा आणि विनयसंपन्न असा होईल.

पातालभूतलव्योम- चारिणश्चद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥११॥

अर्थ : या रामनामांनी रक्षण केलेल्या मनुष्याला पाताळ, भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक डोळ्यांनी पाहूही शकत नाहीत.

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।

नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२ ॥

अर्थ : राम, रामभद्र, रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही व त्याला सुखोपभोग मिळून शेवटी मोक्ष मिळतो.

जगज्जैत्रेकमन्त्रेण रामानाम्नाऽभिरक्षितम् ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धयः ॥१३॥

अर्थ : सर्व जगाला जिंकणारा मुख्य मंत्र जो रामनाम, त्या मंत्राने अभिरक्षित मंतरलेला पदार्थ (ताईत इत्यादी) जो आपल्या गळ्यात धारण करतो, त्याला सर्व सिद्धी सहज हस्तगत होतात.

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥१४॥

अर्थ : इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक, तसे हे रामकवच रामरक्षास्तोत्र – असल्यामुळे यालाही वज्रपंजर असे नाव आहे. याचे जो स्मरण करतो, त्याची आज्ञा अबाधित. सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून नेहमी त्याचे कल्याण होते.

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिकः ॥१५॥

अर्थ : अशी ही रामरक्षा भगवान् शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली, तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून ठेविली.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।

अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६ ॥

अर्थ : रामस्तुति – श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे. सर्व आपत्ती घालविणारा व त्रैलोक्यांत मनोहर असा तो राम आमचा प्रभू आहे.

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७ ॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।

रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९॥

अर्थ : वयाने तरुण, रूपवान, सुकुमार,तिशय बलवान, कमलपत्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले, वल्कले आणि कृष्णाजिन हीच वस्त्रांप्रमाणे परिधान करणारे, कंदमूल- फले भक्षण करणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे. सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुलाचा संहार करणारे व रघुकुलातील प्रमुख असे दशरथाचे पुत्र राम-लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत.

आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षया शुगनिषङ्गसंगिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

अर्थ : सज्ज धनुष्ये हाती धारण करणारे, बाणांना हस्तस्पर्श करणारे व अक्षय्य बाणांचे भाते बाळगणारे राम-लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत.

संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१ ॥

अर्थ : निरंतर सज्ज असलेला, अंगात कवच (चिलखत) घातलेला, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा, आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय, असा लक्ष्मणासह गमन करणारा तरुण राम आमचे रक्षण करो..

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तमः ।। २२ ।।

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकी वल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥२३॥

इत्येतानि जपेन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ॥२४॥

अर्थ : आनंद देणारा, दशरथाचा पुत्र,शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा,. बलवान. काकुत्स्थकुलोत्पन्न, महापुरुष, पूर्णब्रह्म, कौसल्यातनय, रघूत्तम, वेदांतशास्त्राने ज्ञेय, यज्ञांचा स्वामी, पुराणपुरुषोत्तम, जानकीचा प्रिय, वैभवसंपन्न, अतुल पराक्रमी, अशा या नावाचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते, यात संशय नाही. (असे शंकराचे अभिवचन आहे.)

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ।। २५ ।।

अर्थ : दूर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा, कमलनेत्र आणि पीतांबर परिधान करणारा अशा रामाची या दिव्य नावांनी जे मनुष्य स्तुती करितात, ते जन्म-मरणाच्या संसारातून सुटतात.

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् ।

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।

राजेन्द्र सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं ।

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ २६ ॥

अर्थ : लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता,रघुकुलश्रेष्ठ, सीतेचा पती, सुंदर, काकुत्स्थकुलोत्पन्न, दयासागर, सद्गुणांचा निधी, ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, धार्मिक राजेंद्र, सत्यप्रतिज्ञ दशरथपुत्र, सावळ्या वर्णाचा, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रू जो राघव श्रीराम, त्याला मी वंदन करतो.

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।

रघुनाथाय नाथाय सीतायः पतये नमः ॥ २७ ॥

अर्थ : राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस्, रघुनाथ, नाथ, अशी ज्याची नावे आहेत. त्या सीतापतीला माझा नमस्कार असो.

श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम ।

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २८॥

अर्थ : हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधू श्रीरामा, हे रणांगणात कठोरपणा करणाऱ्या श्रीरामा, रामा, तू आमचा रक्षणकर्ता हो !

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ॥

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २९॥

अर्थ : मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांना मस्तकाने नमन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणी शरण आलो आहे.

माता रामो मत्पिता रामचन्द्रः ।

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३० ॥

अर्थ : माझी माता व माझा पिता रामचंद्रआहे. माझा स्वामी व माझा मित्र रामचंद्र आहे. फार काय, माझे सर्वस्वच हा दयाळू। रामचंद्र आहे. दुसऱ्या कोणाला मी जाणत नाही, मुळीच जाणत नाही; अगदी जाणत नाही.

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्॥३१॥

अर्थ : ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे व ज्याच्यापुढे मारुती उभा आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करतो.

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं । श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥ ३२ ॥

अर्थ : लोकांना आनंद देणारा, रणांगणांत धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती व दयेची मूर्ती असा जो करुणासागर श्रीरामचंद्र, त्याला मी शरण आलो आहे.

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं ।श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३३ ॥

अर्थ : मारुतिस्तुति- मनाप्रमाणे वेगळेगमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान,आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा,बुद्धिमंतांत श्रेष्ठ आणि वानरसमुदायाचा मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे.

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मिकीकोकिलम् ॥३४॥

अर्थ : वाल्मिकीवंदन – कवितेच्या फांदीवर बसून, ‘राम राम’ अशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळेला मी वंदन करतो.

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३५ ॥

अर्थ : रामवंदन – आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम त्याला मी पुनःपुन्हा नमस्कार करतो.

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ॥

तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥ ३६ ॥

अर्थ : राम, राम अशी रामनामाची गर्जना ही संसाराची बीजे भर्जन करणारी (भाजून टाकणारी), सुखसंपत्तीचे अर्जन ( प्राप्ती) करणारी, आणि यमाच्या दूतांना तर्जन (भय) करणारी अशी आहे.

रामो राजमणिः सदा विजयते। रामं रमेशं भजे ।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३७॥

अर्थ : राजश्रेष्ठ ‘राम’ नेहमी विजय पावतो. त्या रमापती (सीतापती) ‘रामास’ मी भजतो. ‘रामाने’ राक्षसांची सेना मारली. त्या ‘रामाला’ माझा. नमस्कार असो. मला ‘रामाहून’ दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही. मी ‘रामाचा’ दास आहे. माझ्या चित्ताचा लय नेहमी ‘रामाचे ठायी’ होवो. हे ‘रामा’, माझा तू उद्धार कर !

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥ ३८ ॥

इति श्रीबुधकौशिकविरचितं

श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् । श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

 अर्थ : शिव पार्वतीला सांगतात – हे सुवदने, राम, राम, राम, राम अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठायी रममाण होतो. श्रीरामाचे नाव हे (विष्णूच्या) सहस्रनामाशी बरोबरी करणारे आहे.

याप्रमाणे बुधकौशिकऋषींनी रचिलेले श्रीरामरक्षास्तोत्र समाप्त झाले.

ते श्रीसीता-रामचंद्राच्या चरणी अर्पण असो!

Ram Rasha Stotra PDF

Ramraksha Stotra in Marathi pdf