Sant Tukaram information in Marathi

Sant Tukaram information in Marathi

संत तुकाराम महाराज इन्फॉर्मशन इन मराठी

  • संपूर्ण नाव – तुकाराम बोल्होबा अंबिये.
  • जन्म – १५९८
  • जन्म गाव – देहूगाव
  • मृत्यू – १६४९

Tukaram Maharaj image

sant-tukaram-information-in-marathi

तुकाराम महाराजांविषयी थोडक्यात वर्णन

भारतीय साधुसंतांनी भारतीय संस्कृतीची मूल्यात्मक जडण-घडण केली आहे. सहिष्णुता, अहिंसा, सत्य, न्याय, करुणा आणि मानवता हे सर्वच भारतीय साधुसंतांच्या शिकवणुकीचे पंचप्राण होते. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम हे चौघे वारकरी संप्रदायाचे शिल्पकार बनले. त्यांतील बहुमुखी प्रतिभा असलेल्या तुकारामांची गणना महान भारतीय संतकवींमध्ये करावी लागेल.

मराठी भाषा आणि संस्कृती, मराठी माणसाचा स्वभाव आणि त्याची कृतिउक्ती यांची ओळख करून घेण्याचा मानदंड म्हणजे तुकारामांची कविता होय. संत काळातील अखेरचा सर्वश्रेष्ठ संतकवी म्हणून तुकारामांची ओळख पटते. जीवनाचे प्रभावी भाष्यकार आणि टीकाकार, संस्कृतीला स्पष्ट करणारे समाजचिंतक, सर्वसामान्य माणूस आणि सिद्धसंताचं व्यक्तित्व लाभलेले तुकाराम मराठी भाषेचे शिवाजी ठरतात.

तुकाराम महाराजांचा जन्म

तुकाराम महाराजांचा जन्म इ.स. १५९८ साली झाला. शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा हा महाराष्ट्रातील कालखंड होता. भौतिक दुरवस्था आणि मानसिक गुलामगिरी यातून अशिक्षित, गरीब, भोळ्याभाबड्या समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकता शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी राजकीय पातळीवर प्रयत्न केले, तर साधुसंतांनी सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रयत्न केले. त्यात तुकाराम अग्रेसर होते.

पुण्याच्या उत्तरेला आळंदीपासून जवळच इंद्रायणी नदीच्या काठी देहूगाव हे तुकारामांचं जन्मगाव होय. ‘मोरे’ हे त्यांचं कुलनाम असून तुकाराम बोल्होबा अंबिये हे त्यांचं संपूर्ण नाव. महाजनकी हा पिढीजात वाण्याचा धंदा तुकाराम चालवीत. पण त्यात यश मिळालं नाही आणि कुटुंबात एकापाठोपाठ एक असे मृत्यू झाले. त्यांच्या वृत्ती वितळल्या आणि ते ईश्वरी चितनाकडे लागले. दुःख, हालअपेष्टा, दारिद्र्य यांमुळे आतून-बाहेरून तुकारामांचं संवेदनशील मन भरडून निघालं व त्यातून काव्याची संजीवनी मिळून त्यांची काव्य-भागीरथी प्रवाही झाली.

तुकाराम महाराजांचे अभंग

तुकारामांच्या जवळजवळ साडेचार हजार अभंगांत रूपकात्मक अभंग वगळल्यास आत्मनिवेदनपर अभंग येतात. कारण तेच तुकारामांचं चरित्र आणि आत्मचरित्र ठरतं. आपलं कुळ, जात, कुटुंब, भोवतालची परिस्थिती, समाजाची दुर्दशा, जातिजमातींमधील हाडवैर, भोंदू साधुगिरीचा निर्माण झालेला सुकाळ, समाजाने तुकारामांचा केलेला छळ, यांचं स्पष्ट प्रतिबिंब तुकारामांच्या अभंगांमधून डोकावतं. आत्मसंघर्षाची कविता यामधूनच जन्माला आली.

भजन, कीर्तन, स्मरण, ईश्वराची आळवणी आणि आपली सुखदुःखं ईश्वराला सांगणं ही तुकारामांची भूमिका सगुणभक्तीची भूमिका आहे. आत्मिक उन्नतीचा ध्यास, जगाचं कल्याण आणि दुर्जनांना फटकारणं हे ध्येय ‘धर्म रक्षावयासाठी। करणे आले आम्हासी’ किंवा ‘आम्ही विष्णुदास आलो याचकारणी’ यातून स्वकर्तव्य आणि स्वतः पुढील आदर्श तुकारामांनी स्पष्ट केला.

‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असं म्हणून तुकाराम मन- देह-समाज-ईश्वर यांच्यातील संघर्ष सांगतात. मोकळ्या मनाने, स्पष्टवक्तेपणातून आणि प्रत्यक्षनिष्ठेतून तुकाराम अभंगातून बोलू लागतात. हे बोल अनुभवाचे असल्यामुळे सामान्य माणसास आपलंच रूप त्यातून दिसू लागतं. जानपद, गावरान, लोकजीवनाचा गंध असलेली त्यांची भाषा सर्वसामान्य माणसाला आपली वाटते. एवढंच नव्हे, तर आधुनिक मराठी कवितेवर आणि विचारवंतांवर तुकारामांनी आपल्या विचारांचा व भाषेचा अमीट ठसा उमटवला आहे. सुभाषितपरता हे तुकारामांच्या अभंगांचं वैशिष्ट्य ठरतं.

‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ इतकं पारदर्शक मन तुकारामांचं होतं. तुकाराम वारकरी संप्रदायातील स्वतंत्र बाण्याचे एक सुधारक संत होते. त्यांना नवसमाजनिर्मिती करायची होती. त्यासाठी स्वयंप्रेरित आत्मशोध तुकारामांनी संघर्षातून घेतला आणि आत्मसाक्षात्कारानंतर उपदेशाची भूमिका घेऊन समाजातील हीण नष्ट करण्यासाठी आपली वाणी परजली. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना प्रपंच आणि परमार्थात एकरूप केलं आणि बहुजनसमाजाला मोक्षाची दिशा दाखवली.

तुकारामांनी आपल्या अभंगनिर्मितीतून भक्तीचे केशरमळे जसे फुलवले,

तसंच खटासी खट होऊन भोंदूगिरीवर प्रहारही केला. मराठी माणसाचे ‘खडे बोल’ तुकारामांच्या कवितेतून ऐकू येतात. ‘मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास। कठिण वज्रास भेदू ऐसे’, ‘वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि’ असं तुकारामांचं भावविश्व आणि अंत:करण होतं.

तुकारामांनी समाजाचं नेतृत्व केलं आणि नवसमाजनिर्मितीसाठी आपली वाणी झिजवली. अध्यात्म आणि वास्तव व्यवहार यांची सांगड घालून भक्तीच्या एका सूत्रात समाजाला एकत्र आणलं. म्हणूनच महाराष्ट्रावर परकीय आक्रमण झालं तरी मराठी मन आणि मराठी बाणा ‘अभंग‘ राहिला. तुकारामांच्या भक्तिविचाराला नीतिविचाराची बैठक आहे.

अद्वैत भक्तीच्या पायावर मानवतेचं ‘जागरण’ तुकारामांनी केलं म्हणून ते ‘भोरपी’, ‘जागल्या’ अशा स्वरूपाचे सुधारक ठरले. त्यांनी कर्मप्रधान भक्तिमार्गाची शिकवण समाजास दिली. समाजाचं नेतृत्व त्यांनी केलं, तसंच विश्वबंधुत्वाचं यशोगीतही कणखरपणाने गायलं !

तुकारामांचं साहित्यही महत्त्वाचे ठरलं ते त्यांच्या अनेकविध गुण- वैशिष्ट्यांमुळे. तुकारामांच्या अभंगात ‘संसृतिटीका’ आली आहे. दंभ, दर्प, मद, मत्सर यांवर त्यांनी हल्ला चढवला. मराठी मातीच्या गंधातून निर्माण झालेल्या त्यांच्या कवितेतील चैतन्य आणि कलात्मकता व त्याचप्रमाणे सांस्कृतिक झगड्याचा आशय जनसामान्यांना भावला, भिडला.

तुकाराम महाराजांचे जीवन

जीवन आणि काव्य यांचं एकात्म, गोळीबंद रूप साधणारे त्यांचे अभंग प्रदीर्घ काळ परिणामकारक ठरले. आत्मनिष्ठ काव्याचा आविष्कार, अनुभवांची उत्कटता, कोवळिकतेने आविष्कृत झालेला आशय, रोखठोक शैली अशा विलोभनीय रूपातून साकारलेले त्यांचे काव्य चिरकाल टिकणारे ठरले.

मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी माती यांचं सालंकृत दर्शन तुकारामांनी घडवलं. ‘अणुरेणुया थोकडा। तुका आकाशाएवढा’ असं म्हणणाऱ्या तुकारामांचा मराठी समाजाने कवी, समाजचिंतक, विचारवंत, द्रष्टे, शिक्षक, संसृतिटीकाकार, मानवतावादी गृहस्थ, लोकशिक्षक अशा अनेकविध रूपांमध्ये स्वीकार केला, वाङ्मयीन महत्ता आणि व्यक्तिमत्त्वाची महानता असलेले थोर कवी, समाजसुधारक आणि विचारवंत, शतकात किंवा सहस्रकात मोजकेच घडतात. तुकाराम हे त्यांपैकीच एक आहेत!

तुकाराम महाराजांचा मृत्यू

तुकाराम महाराजांचा मृत्यू इ.स. १६४९ साली झाला.

Summery

Sant Tukaram information in Marathi

श्री संत तुकाराम महाराज इ. सन १६०८-१६४९

देहू गावी समृध्द घराण्यात यांचा जन्म झाला. यांचे आईवडील दोघेही सात्विक वृत्तीचे विठ्ठल भक्त व नित्यनियमाने पंढरीची वारी करणारे होते. यांचे बालपण व नंतरचा काही काळ सुखात गेल्यानंतर दैवाच्या वक्रगतीमुळे बऱ्याच संकटातून जावे लागले. पत्नी व मुलगा अन्न अन्न करीत निवर्तले. द्वितीय पत्नी कजाग व आक्रस्ताळी होती म्हणून तिच्यापासून यांना आयुष्यात सुख मिळण्याची आशाच नव्हती.

म्हणून हे भंडारा नामक डोंगरावर सदा सर्वकाळ ईश चितनात मग्न राहू लागले. देहू गावातील विठ्ठल मंदिराचा त्यांनी जीर्णोध्दार करून तेथे कथा कीर्तने, नामस्मरण करून पारमार्थिक जीवनाची घडी स्थिर केली. संसारात राहून परमार्थ करण्याचे असिधाराव्रत अंगीकारले.

एकवीसाव्या वर्षी बाबाजी चैतन्य या सद्‌गुरूंचे दर्शन घडून त्यांच्याकडून षडाक्षरी मंत्र मिळाल्यावर नामस्मरण व कीर्तन करावे अशी दिनचर्या सुरु झाली. आयुष्यात बद्ध, मुमुक्षु, साधक व सिध्द या चारही अवस्था होऊन गेल्या. काम, क्रोध, लोभ हे महादोष नाहीसे झाले, पण साक्षात्कारासाठी त्यांचा जीव तळमळत होता.

अखेर प्रार्थना फलद्रुप होऊन पांडुरंगाचे सगुण दर्शन घडून जीवनमुक्त दशा प्राप्त झाली. आपल्या देहाचा तंतू तोडून देवाकडे जाण्याची उत्कंठा होऊ लागली, कीर्तनात दंग असतानाच भगवान विष्णू स्वतः आपल्याकडे येत असलेले दिसल्यावर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पांडुरंगाला जास्त वेळ तिष्ठत न ठेवता सर्वांचा निरोप घेऊन, सर्वांचे कल्याण होवो असा आशीर्वाद देऊन सदेह वैकुंठाला गेले. यांनी उस्फूर्तपणे रचलेले हजारो अभंग “तुकारामांची गाथा” यात वाचावयास मिळतात.

तुकाराम महाराज इन्फॉर्मशन इन १० लाईन्स

१. तुकाराम महाराजांनी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात.
२. जन्म: इ.स. १५९८, मृत्यू: १६४९. त्यांचे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी आळंदीपासून जवळ देहूगाव.
३. जीवनाच्या संघर्षातून उक्ती: ‘आम्ही विष्णुदास आलो याचकारणी’ जसे बद्दल त्यांनी उक्ती केल्या.
४. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना प्रपंच आणि परमार्थात एकरूप करणारे मराठी कवी तुकाराम.
५. तुकारामांनी अभंगातून ‘संसृतिटीका’ आली, जी छळ आणि अंत:करण प्रतिष्ठित करणारी आहे.
६. त्यांची साहित्यिक कौशल्य आणि अत्यंत विचारवंत सोपऱ्या भाषेत एकूण थांबणारी व भाषांतरापर कविता.
७. तुकाराम भक्तपरायण, कर्मप्रधान भक्तिवादी आणि सामाजिक सुधारक होते.
८. त्यांच्या काव्यात दंभ, दर्प, मद, मत्सर निर्माण करण्यात यशस्वी होतात.
९. तुकारामांनी धर्म, विचारवंतता, लोकशिक्षक, मानवतावादी आणि वाङ्मयी गृहस्थ होऊन अनेकविध रूपांमध्ये स्वीकार केले.
१०. तुकाराम हे आपल्या जीवन, काव्य आणि भक्तिविचारांच्या सामन्य गोळीबंद रूपात ठरवून मराठी समाजाला जोडलं.

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला Sant Tukaram information in Marathi हि पोस्ट आवडली असेल. सनातन धर्माशी संबंधित अशीच इतर माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी कनेक्ट रहा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला आणि भरभराटीचा जावो